नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्यासाठी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे ही परत एकदा अशाच पोस्ट्स साठी अडचणीत सापडली आहे. काही काळापूर्वी केतकी शिवभक्तांविषयी असेच एक व्यक्तव्य केल्याने चर्चेत आली होती. यावेळेस तर तिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याविषयी खालच्या दर्जाच्या टिप्पणीची पोस्ट केली आहे.

Ketki chitale viral post

केतकी चितळे हीने नुकतीच फेसबुक वर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. तिने शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याबद्दल पोस्ट केली. केतकीच्या पोस्ट मध्ये पवार हे आडनाव व 80 वर्ष असा उल्लेख केल्याने ही पोस्ट शरद पवार यांच्या विषयी असल्याचेच म्हटले आहे. या पोस्टला घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात राग निर्माण झाला होता.

Ketki chitale viral post

केतकी चितळे हिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या अटकेची मागणी केली जात होती. दिनांक 14 मे रोजी संध्याकाळी केतकीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच तिला अटक होण्याची शक्यता होती. केतकी विरोधात ठाणे, सातारा व पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली असून तिच्या अडचणीत वाढ झाली होती. आज दिनांक 15 मे रोजी न्यायालयाने निकाल दिला असून केतकीला कोर्टाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.

Ketki chitale viral post

केतकीच्या पोस्टचा राष्ट्रवादी सोबतच इतर पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला असून त्यामध्ये नवनीत राणा, राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. केतकीच्या पोस्ट मध्ये तिने शरद पवार यांना ब्राह्मण द्वेषी असल्याचे म्हटले आहे. तसेच, ही पोस्ट तिची स्वतःची नसून पोस्ट च्या शेवटी ॲडव्होकेट नितीन भावे यांचे नाव आहे.

Ketki chitale viral post

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *