सध्याच्या युगात सोशल मीडियाचा वापर करून अनेकजण स्वतःच्या अंगातील टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच, अनेकजण सोशल मीडियावर स्वतःच्या मजेशीर व्हिडिओज पोस्ट करून नेटकऱ्यांचे मनोरंजन करताना दिसून येतात. सध्या एक आजोबा त्यांच्या व्हिडिओ द्वारे लोकांचे मनोरंजन करून लोकप्रियता मिळवीत आहेत.
नाशिकच्या सिडको हनुमान चौक येथे राहणारे विजय खरोटे हे 62 वर्षीय आजोबा सध्या इंस्टाग्राम वर फेमस होताना दिसून येत आहेत. विजय हे इंस्टाग्राम वर काही कॉमेडी रील्स बनविताना दिसतात तर कधी गाण्यावर थिरकत असतानाचे रील्स बनवितात. फक्त नाशिक मध्येच नाही तर विजय हे संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होत आहेत.
विजय यांचे इंस्टाग्राम वर सध्या 52 हजार फॉलोवर्स असून ते फॉलोवर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यापूर्वी त्यांचे टिकटॉक या ॲप वर लाखो फॉलोवर्स होते. त्यांनी पोस्ट केलेले काही व्हिडिओज प्रचंड व्हायरल झाले आहेत. “कुछ तो बात है इस चेहरे मे” या कॉमेडी व्हिडिओला तर तब्बल 1 करोड 30 लाख लोकांनी पाहिले आहे.
विजय हे तरुणपणी ऊसाच्या रसाची गुराळ चालवायचे. त्यांचा पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांना जुन्या गाण्यांची जास्त आवड असल्याने रील्स व्हिडिओज बनविताना त्याच गाण्यावर जास्त बनवीत असतात. या 61 वर्षीय आजोबाचे व्हिडिओज पाहून वय हे फक्त नंबर आहे, असेच वाटते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.