2 दिवसांपूर्वी लोकप्रिय पंजाबी गायक व काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याची काही अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबाला व सर्व फॅन्सला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे हत्येच्या एक दिवस अगोदरच पंजाबच्या “आप” सरकारने त्याची सुरुक्षा काढून घेतली होती. त्यामुळे अनेकांना आप सरकार बद्दल संताप व्यक्त केला.
हत्येच्या दुसऱ्याच दिवशी या घटनेची जबाबदारी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा कॅनडा मधील साथीदार गोल्डी बराडने घेतली आहे. परंतु, सिद्धूची हत्या का करण्यात आली यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. गोल्डी बराडने सोशल मिडीयावर केलेल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, माझे भाऊ विक्रमजित सिंग मिदूखेरा व गुरलाल बराड यांच्या हत्येमागे सिद्धू मुसेवाला याचे नाव आले होते. परंतु, पंजाब पोलीस ने त्याच्या विरुद्ध कोणतीच कार्यवाही केली नव्हती.”
“तसेच, मुसेवाला याचे नाव आमचे असोसिएट अंकित के एन्काऊंटर मध्ये पण घेण्यात आले होते. तसेच, मुसेवाला हा आमच्या विरुद्ध काम करीत होता. त्यामुळे मी, सचिन बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई त्याच्या हत्येची जबाबदारी घेत आहोत” असे पुढे पत्रात लिहिण्यात आले होते. त्यामुळे सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचे गूढ आता उलगडे आहे.
मिळालेल्या माहिती नुसार अकाली दलचे नेते विक्रमजीत मेदूखेरा यांची 7 ऑगस्ट 2021 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचाच बदला या गँगस्टरने घेतला आहे. यापैकी लॉरेन्स बिश्नोई हा अगोदर पासूनच सध्या तिहार जेल मध्ये शिक्षा भोगत आहे. यासंबंधी पुढील तपास पंजाब पोलिसांकडून करण्यात येत आहे.