मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्याच उंचीवर नेण्यात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ या अभिनेत्यांचा मोलाचा वाटा आहे. या तिघांनी अनेक हिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देत 80, 90 चे दशक गाजवून सोडले होते. परंतु, आता यांच्या चित्रपटात काम केलेल्या एका अभिनेत्रीचे दुःखद निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे.

Prema kiran news
आज महाराष्ट्र दिनाची सुरुवात होताच पहाटे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता समोर आली. प्रेमा किरण यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मराठी सोबतच अनेक हिंदी चित्रपटात काम केलेल्या या अभिनेत्रीच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

प्रेमा किरण यांनी दे दणादण, धूमधडाका, गडबड घोटाळा, अर्धांगी, माहेरचा आहेर, सौभाग्यवती सरपंच, अर्जुन देवा, उतावळा नवरा यासारख्या अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यात धूमधडाका चित्रपटात त्यांनी साकारलेली “अंबाक्का”ची भूमिका विशेष गाजली होती. त्यांचे लक्ष्मीकांत बेर्डे सोबतचे “पोलीस वाल्या सायकल वाल्या” हे गाणे जास्त अजूनही हिट आहे. तसेच, प्रेमा किरण या “उतावळा नवरा” या चित्रपटाच्या निर्मात्या देखील होत्या.

झी मराठी वाहिनीवरील “हे तर काहीच नाही” या शो मध्ये मागील जानेवारी महिन्यात त्यांनी उपस्थिती लावली होती. या शो मध्ये त्यांनी धमाल कॉमेडी देखील केली होती. “पोलिस वाल्या सायकल वाल्या गाण्याच्या शूटिंग वेळी मला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 3 वेळा सायकल वरून पाडले होते. मी 3 वेळा पडले म्हणूनच चित्रपट हिट झाला” असा मजेशीर किस्सा त्यांनी त्या शो मध्ये सांगितला होता. प्रेमा किरण यांच्या अचानक जाण्याने अनेकांना विश्वास बसत नाहीये. मर्द मराठी तर्फे प्रेमा किरण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Prema kiran news

ही माहिती जास्तीत जास्त शेयर करा व कमेंट करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *