वेब सीरिजच्या या जमान्यात वेग वेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या भाषेतील वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येतात. आता हिंदी प्रमाणेच मराठी प्रेक्षकांसाठी “प्लॅनेट मराठी” या ओटीटी प्लॅटफॉर्म वर मराठी वेब सिरीजची सुरुवात झाली आहे. नुकतेच “रान बाजार” या नव्या कोऱ्या वेब सिरीजचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

मराठीतील नामवंत कलाकारांना सोबत घेऊन बनविण्यात आलेल्या “रान बाजार” या वेब सीरिजच्या टीजर आणि ट्रेलरची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी व अभिनेत्री तेजस्विनी पंडित या दोघींचा अवतार पाहून प्रेक्षक अचंबित झाले आहेत. या वेब सिरीजच्या पहिल्या 2 टीझर मध्ये दोघींना बोल्ड सीन देताना दाखविण्यात आले आहे.

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिॲलिटी शो मध्ये सूत्र संचालिकाचे काम करणाऱ्या प्राजक्ता आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर मध्ये ती पेपर वाचत एक बोल्ड सीन देताना दिसून आली आहे. त्यामुळे या वेब सीरिज मध्ये तिचा नेमके काय रोल असेल हे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

 

प्राजक्ता सोबतच तेजस्विनी पंडित ही देखील तशाच बोल्ड अंदाजात दिसून आली आहे. तसेच, या वेब सीरिज मध्ये उर्मिला कोठारे, माधुरी पवार या दोघी देखील दिसून येणार आहेत. तसेच, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी असे दिग्गज कलाकार देखील दिसून येणार आहेत.

Ranbazaar treaser

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.