अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून काही मराठी कलाकारांनी बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अभिनेता विराजस कुलकर्णी याने अभिनेत्री शिवानी रांगोळे सोबत लग्नगाठ बांधली. तसेच, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडींपैकी एक असणाऱ्या हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांचा त्याच दिवशी साखरपुडा संपन्न झाला.
विराजस व शिवानी या दोघांच्या नात्याबद्दल गेल्या काही वर्षापासून चर्चा होती त्यामुळे अनेकांना या दोघांचे लग्न होणारं याची कल्पना होती. परंतु, हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुड्याला घेऊन अनेकजण चकित झाले. हे दोघे कधीपासून रिलेशन मध्ये होते हाच प्रश्न सर्वांना पडला. त्यामुळे सर्वांनाच या दोघांचा साखरपुडा झालेला पाहून धक्का बसला.
अक्षयाने जेंव्हा साखरपुड्याची फोटो पोस्ट केली त्यावर अनेक कलाकारांनी कमेंट करून या दोघांना शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये भूतकाळात अक्षया सोबत नाव जोडल्या गेलेल्या सुयशने देखील “congratulations” (अभिनंदन) अशी कमेंट केली. त्या कमेंटवर अक्षयाने “थँक यू” असा रिप्लाय दिला.
अक्षया व सुयश या दोघांचा काही काळापूर्वी ब्रेकअप झाला होता व दोघांनी सोशल मीडिया वर एकमेकांना अनफॉलो देखील केले होते. काही महिन्यांपूर्वी सुयश याने अभिनेत्री आयुषी भावे सोबत लग्नगाठ बांधली होती. तसेच, तुझ्यात जीव रंगला मालिकेत एकत्र दिसून आलेल्या अक्षया व हार्दिक हे मालिके प्रमाणेच खऱ्या आयुष्यात देखील एकत्र संसार थाटण्यासाठी तयार आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.