2 वर्षापूर्वी याच दिवशी बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे दुःखद निधन झाले होते. त्याच्या निधनाची वार्ता समोर येताच बॉलिवुड सोबत संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली. आता बॉलिवुड फॅन्सची चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हीची प्रकृती खराब झाल्याने तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Deepika padukon health news

दीपिका ही सध्या हैद्राबाद येथे “प्रोजेक्ट के” या आगामी चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त होती. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन व अभिनेता प्रभास देखील दिसणार आहेत. शूटिंग चालू असतानाच दीपिकाची तब्येत बिघडल्याने तिला दवाखान्यात हलविण्यात आले. दीपिकाचे हृदयाची गती वाढल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आल्याचे समजते.

Deepika padukon health

ही बातमी ऐकून दीपिकाच्या फॅन्स मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला चेक केले व तिची प्रकृती अगोदर पेक्षा ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दीपिका ही बॉलिवुडची टॉप 3 मधील एक अभिनेत्री मानली जाते त्यामुळे तिच्या फॅन्स मध्ये काळजीचे वातावरण असणे साहजिकच आहे.

Deepika padukon health

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *