वाहनाच्या नियमाचे उल्लंघन करणे हे कायद्याने गुन्हा असतो. परंतु, ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला तर तो देखील एक प्रकारे गुन्हाच होतो. ट्रॅफिक पोलिसांना वाहनधारकांवर हात उचलण्याचा अधिकार नसताना देखील अनेकदा अशा प्रकारच्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आलेले आपण पाहिले आहेत.

तामिळनाडू येथून देखील सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यात एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल एक डिलिव्हरी बॉयला मारहाण करताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना तामिळनाडूच्या सिंगनल्लुर शहरातील आहे. सदरील व्हिडिओ मध्ये त्या स्वीगी डिलिव्हरी बॉयला कॉन्स्टेबलने का मारले याचे कारण देखील स्वतः डिलिव्हरी बॉय मोहन सुंदरमने सांगितले आहे.

 

 

मोहन सुंदरम म्हणाला, “एक महिला आणि एक पुरुष रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी एका शाळेच्या बस ने त्या महिलेला धडक दिली. महिलेसोबत असलेल्या पुरुषाने त्या बसला थांबविण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मी त्या शाळेच्या बस समोर माझी गाडी नेऊन थांबविली.” मोहनने त्या शाळेच्या बसला थांबविल्याने त्या रस्त्यावर थोडीशी ट्रॅफिक जॅम झाली होती.

 

मोहन सुंदरमचे हे कृत्य कॉन्स्टेबलला आवडले नाही व त्याने मोहनच्या कानशिलात लगावली व त्याचा मोबाईल देखील घेतला. या घटनेनंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला व त्या पोलीस कॉन्स्टेबलला याची शिक्षा म्हणून त्याची बदली दुसऱ्या शहरात करण्यात आली. तसेच, डिलिव्हरी बॉयच्या कार्याचे सर्वजण कौतुक करताना दिसून येत आहेत.

 

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *