पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या निधनाची वार्ता ताजी असतानाच भारताच्या आणखीन एका लोकप्रिय गायकाची बातमी समोर आली आहे. गेली 3 दशके ज्याने बॉलिवुड इंडस्ट्रीला एका पेक्षा एक उत्तम गाणे देणारे गायक “कृष्णकुमार कुन्नथ (केके)” यांच्या निधनाची वार्ता समोर आली आहे. केकेच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
दिनांक 31 मे दिवशी केके हे कोलकत्ता येथील सर गुरूदास महाविद्यालय येथे एका कॉन्सर्ट साठी उपस्थित होते. हे कॉन्सर्ट संपण्याच्या वेळी केके यांची तब्येत अचानक बिघडली व त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहिती नुसार केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याचे समजते. केकेच्या निधना पूर्वीचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.
कोलकात्यातील शेवटच्या कॉन्सर्ट मधील व्हिडिओत के.के. अत्यंत उत्साहात गाणे गाताना दिसत होते. महाविद्यालयातील तरुण तरुणींनी देखील के.के. चा गाण्यांचा मनसोक्त आनंद लुटला. परंतु, त्या सर्वांना थोडीही कल्पना नव्हती की के.के यांच्या आयुष्यातील हे शेवटचे कॉन्सर्ट असेल. त्यातच के.के. यांनी त्यावेळी “हम रहे या ना रहे कल” हे गाणे गायले व त्या गाण्याचा अर्थ त्यांच्या जीवनाशी संबंध निघाल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत.
के.के. यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 दिल्ली येथे झाला व ते तिथेच लहानाचे मोठे झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा कुटुंब आहे. के.के. यांनी तडप तडप, आँखो मे तेरी, जरा सा दिल में दे जगह यासारखी एका पेक्षा एक हीट गाणी गायली होती व त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाली होती.