अभिनय क्षेत्रातील कलाकारांमध्ये सध्या बोल्ड लुक दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. अभिनेत्रींसोबतच अभिनेते देखील बोल्ड फोटो शूट करताना दिसून येत आहेत. नुकतेच बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या बोल्ड फोटोज् मुळे चर्चेत आला होता. आता एक मराठमोळी अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्या मनमोहक फोटोज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Akshaya hindalkar actress news

अक्षया हिंदळकर हिने काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह वर येऊन गेलेल्या “तुझ्या इश्काचा नादखुळा” या मालिकेत प्रमुख अभिनेत्रीचीची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने स्वातीची हे पात्र उत्तमरीत्या साकारले होते. रघू व स्वाती या जोडीला देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले होते. आता तीच अभिनेत्री सध्या तिच्या हटके फोटोज् मुळे जास्त चर्चेत आहे.

अक्षया हिंदळकर ही तिच्या फिटनेसमुळे युवा पिढीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असते. अक्षया हिंदळकर हीचा जन्म 17 मे 1996 रोजी मुंबई मध्ये झाला. तिने तिचे शालेय शिक्षण मुंबई मध्ये पूर्ण केले तर वाशी येथून तिने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कॉलेज मध्येच असतानाच तिला अभिनायची आवड होती व तिथूनच तिच्या अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला.

नाटका पासून अभिनयाची सुरुवात केलेल्या अक्षयाने कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्या मालिकेतील तिची वंदना या भूमिकेला लोकांनी पसंत केले. परंतु, तिची खरी ओळख तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेतून झाली. सध्या तिच्या बोल्ड फोटोज मुळे जास्त चर्चेत आहे.

Akshaya hindalkar actress

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *