झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांमध्ये “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेचा देखील उल्लेख केला जातो. जवळपास 4 वर्षापेक्षा जास्त काळ ही मालिका चालली होती. जगभरातील मराठी प्रेक्षकांकडून या मालिकेला प्रेम मिळाल्याने मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडून काढले होते.

Anita date latest news
“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत गुरू, राधिका, शनाया हे तीन पात्र विशेष करून गाजले होते. या मालिकेत राधिकाचे पात्र साकारणारी अभिनेत्री अनिता दाते हीची एक फोटो सध्या व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. अनिता दाते हिच्या फोटोला हार घातलेला फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अनिता दातेच्या फोटोला घातलेला हार पाहून तिच्या फॅन्स मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष करून हा फोटो अनिता दाते हीच्याच अकाउंट वर पोस्ट करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार अनिता ही सुखरूप असून हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टचा भाग असल्याचे समजते.

Anita date latest news
अनिताच्या आगामी प्रोजेक्टचे शीर्षक तिने कॅपशन मध्ये टाकले आहे. “जो आवडे सर्वांना” असे कॅपशन तिने टाकले असून यावर काही मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रोजेक्ट मध्ये अभिनेता गौरव घाटनेकर हा देखील असणार आहे. असो पण या फोटो मुळे काहींना धक्का बसला, हे नक्की.

Anita date latest news
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.