बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर अभिनय क्षेत्रात एकच खळबळ माजली होती. त्याच्या निधनानर काही कलाकारांनी स्वतःची जीवनयात्रा संपविल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. तसेच, काही कलाकारांचे आकस्मित निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या.

Sarath chandran actor death news

नुकतेच भाभीजी घर पर है या मालिकेत मलखानची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले. या अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते अजूनही सावरले नाहीत, त्याच दरम्यान आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. केरळमधील लोकप्रिय युवा अभिनेता सरथ चंद्रन याचे वयाच्या 37 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

सरथ चंद्रन याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाजात समोर आले आहे. तसेच, त्यांच्या रूम मधून एक चिट्ठी देखील सापडली असून त्यामध्ये त्याने मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे.

“अंगमली डायरीज” या चित्रपटासाठी तो प्रसिद्ध होता. सरथ चंद्रन हा मल्याळम भाषेतील लोकप्रिय अभिनेते होता. त्याच्या निधनाने मल्याळम कला क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.