काही दिवसांपूर्वी गुजरातच्या एक मुलीने स्वतःशीच विवाह केला होता. तिच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा झाली होती. आता एका लोकप्रिय मालिकेत काम केलेल्या अभिनेत्रीने देखील असेच स्वतःशीच लग्न केल्याची वार्ता समोर आली आहे.

Kanishka Soni actress news

लोकप्रिय हिंदी मालिका “दिया और बाती” मालिका फेम कनिष्का सोनी ही सध्या चर्चेत आहे. याच अभिनेत्रीने स्वतःशी विवाह करून फॅन्सना आश्चर्यचकित केले आहे. रूपवान दिसणाऱ्या या अभिनेत्रीने घेतलेल्या या निर्णयाने अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. काही दिवसांपूर्वी कनिष्काने एक पोस्ट करून स्वतःशीच विवाह केल्याचे सांगितले होते.

 

कनिष्काच्या या पोस्टनंतर अनेकजण तिला या निर्णयामुळे ट्रोल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. “आता पुढे काय करणार?”, “तू विज्ञानाला मागे टाकले आहेस” असे अनेक कॉमेंट्स तिच्या पोस्ट वर आलेले पाहायला मिळत आहेत. या सर्व ट्रोलर्सना कनिष्काने व्हिडिओ द्वारे उत्तर दिले आहे.

 

“मी स्वतःला लाईक करते, मी स्वतःवर प्रेम करते म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे” असे कनीष्काने म्हटले आहे. तिच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत देखील केले आहे. दिया और बाती हम मालिकेत कनीष्काने कविता हे पात्र साकारले होते. तसेच, ती एक उत्तम गायिका देखील आहे.

Kanishka Soni actress news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *