झी मराठी वाहिनीवरील “रात्रीस खेळ चाले” या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळविले. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांवर स्वतःची छाप पाडली आहे. मालिकेच्या दुसऱ्या पर्वात अण्णा नाईक व शेवंता हे दोन्ही पात्र खूप गाजले होते. परंतु, काही कारणास्तव शेवंताचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने तिसऱ्या भागातून निरोप घेतला. त्याचवेळी शेवंताचे पात्र कृतिका तुळसकर या अभिनेत्रीने साकारले होते.

Krutika tulaskar

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या भागाला यश मिळवून देण्यात शेवंता या पात्राचे मोठे योगदान होते. त्यामुळे अपूर्वा नेमलेकरने मालिका सोडल्यानंतर शेवंता हे पात्र साकारण्याचे मोठे आव्हान अभिनेत्री कृतीका तुळसकर हिच्यावर होते. कृतिकाने हे आव्हान पार पाडत शेवंता पात्र उत्तमरीत्या साकारले. आता याच कृतिकाच्या काही बोल्ड फोटोज् सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत.

अभिनेत्री कृतिका तुळसकर ही सध्या तिच्या अशाच बोल्ड फोटोज खूप जास्त चर्चेत असते. “रात्रीस खेळ चाले – 3” मालिकेनंतर कृतिकाचा लुक पूर्णपणे बदललेला दिसून येत आहे. तिच्या मॉडर्न लुक ला फॅन्स कडून देखील पसंती मिळत आहे.

मराठी सीरियल मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर कृतिका लवकरच हिंदी कलासृष्टीत दिसून येणार आहे. तिच्या आगामी हिंदी चित्रपटात ती गिरीज कुलकर्णी, ज्योती सुभाष या कलाकारांसोबत झळकणार आहे. तसेच, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म तीची हिंदी वेब सीरिज देखील येणार असून या वेब सीरिज मध्ये अभिनेते उपेंद्र लिमये सोबत दिसून येणारं आहे.

Krutika tulaskar

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *