गेल्या काही महिन्यांपासून मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मधील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले होते. विशेष करून कोरोना काळात काही कलाकारांचे अकाली निधन झाल्याच्या घटना घडल्या. या बातम्या मधून प्रेक्षक सावरले नाहीत तेच आता आणखीन एका कलाकाराचे अकाली निधन झाले आहे.

Marathi actor death news
आज मराठी अभिनय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे आज निधन झाले आहे. आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी त्यांच्या निधनाची वार्ता समोर आली आणि मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली आहे. आपल्या अभिनयाने प्रदीप यांनी अनेक दमदार भूमिका मराठी कलासृष्टीला दिल्या आहेत. प्रदीप यांचे निधन कोणत्या कारणाने झाले हे आता स्पष्ट झाले आहे.

Marathi actor death news
प्रदीप पटवर्धन यांचे आज मुंबई येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. निधनावेळी त्यांचे वय 64 होते. एक उत्तम अभिनेता गमावल्याने सिनेसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

 

प्रदीप यांनी अनेक चित्रपट व नाटकातून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे “मोरूची मावशी” हे नाटक विशेष गाजले होते. तसेच, “नवरा माझा नवसाचा”, “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय”, “जमलं हो जमलं” अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या. या दमदार अभिनेत्याला “मर्द मराठी” तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.