सध्याची पिढी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून स्वतःमधील कौशल्य जगासमोर दाखविताना दिसून येते. त्यातच काहींचे व्हिडिओ इतके व्हायरल होतात की त्यामुळे ते रातोरात स्टार होवून जातात. अमरावती मधील एक मुलगी सध्या सोशल मीडियावर फेमस झालेली पाहायला मिळत आहे.

Marathi ukhana

त्या मुलीचे नाव श्रुतिका गावंडे असून ती तीच्या विदर्भातील बोली साठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर “विदर्भाची श्रुतिका” या नावाने लोकप्रिय आहे. मूळची अमरावती येथील असणाऱ्या श्रुतिकाला अभिनयाची फार आवड असल्याने ती स्वतःच्या अभिनयाचे व्हिडिओ बनवून पोस्ट करीत असते. सध्या तिचा एक उखाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ वटसावित्री दिवशीचा असून तिच्या उखाण्याच्या व्हिडिओ तब्बल 93 लाख लोकांनी पाहिला आहे. उखाणा घेते वेळी श्रुतिकाने दिलेल्या हावभावला पाहून युवा पिढी आकर्षित झाली आहे. तिचे लग्न न झाल्याने तिने असा उखाणा घेतला होता.

अमरावती मध्येच लहानाची मोठी झालेल्या श्रुतिकाने मास्टर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन (MJMC) ही पदवी देखील मिळविली आहे. श्रुतिका हिचे कॉमेडीचा सात बारा नावाचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. या चॅनेल मधून तिचे व तिच्या टीम सोबतचे कॉमेडी व्हिडीओ पोस्ट केलेले पाहायला मिळतात.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *