झी मराठी वाहिनीवर मालिका बदलांचे सत्र परत एकदा सुरू झालेले पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून 2 नवीन मालिकांचे ट्रेलर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे “मन उडू उडू झालं” व “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या 2 मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे स्पष्ट झालं आहे. आता आणखीन एका नवीन मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Shivani Naik actress

येत्या 22 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7 वाजता “अप्पी आमची कलेक्टर” ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एक वेगळी स्टोरी असल्याने प्रेक्षक देखील आनंदी झाले आहेत. या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार हे आज जाणून घेऊयात.

Shivani Naik actress

“अप्पी माझी कलेक्टर” या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत शिवानी नाईक ही नवीन अभिनेत्री दिसणार आहे. काही नाटकात व काही चित्रपटात काम केल्यानंतर शिवानी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या नवीन मालिकेत ती एका कलेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

Shivani naik

“अप्पी माझी कलेक्टर” या मालिकेत शिवानीच्या वडिलांची भूमिका संतोष पाटील हे साकारताना दिसणार आहेत. संतोष माने यांनी लागिर झालं जी मालिकेत अज्याच्या मामाची भूमिका साकारली होती. तसेच, या मालिकेत अभिनेता अद्वैत दादरकर हा देखील असल्याचे समजते. या मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे या असून त्या देवमाणूस, लागिर झालं जी लोकप्रिय या मालिकेच्या देखील निर्मात्या होत्या.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *