बिग बॉस 14 फेम अभिनेत्री सोनाली फोगाट यांचे 22 ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रासह राजकारणातील अनेक व्यक्तींना मोठा धक्का बसला होता. सोनालीच्या मृत्यूवर अनेक जणांनी संशय व्यक्त केला होता. आता तो संशय खरा झाला असून सोनाली यांचे निधन नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sonali fogat death reason

सोनाली फोगाट या अभिनयासोबतच हरियाणा येथे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाचे कनेक्शन राजकारणातील द्वेष आहे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. सुरुवातीला त्यांचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टने या प्रकरणाला वेगळे रूप दिले.

 

पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सोनालीच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट झाले. तीक्ष्ण हत्याराने सोनाली यांच्यावर वार गेल्याचे उघड झाले होते. सोनालीच्या कुटुंबाने केलेल्या आरोपानंतर सोनालीच्या सहकारी सुधीर व सुखविंदर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या केस मध्ये एका सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने सुधीर व सुखविंदर हेच सोनालीच्या खुनाचे मुख्य आरोपी असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

 

समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये सुधीर हा सोनालीला घेऊन जाताना दिसून येत आहे. व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येत आहे की सोनाली ने ड्र’ग्स चे सेवन केले होते व तिच्या पायाला जखम झाल्याने ती लंगडत चालत आहे. पहाटे 4 वाजता सोनालीला सुधीर यांनी शौचालयास नेले व नंतर 2 तास आत मध्ये काय केले हे प्रश्न गोवा पोलीस आरोपींना विचारीत आहेत.

Sonali fogat News

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *