गेल्या 2-3 वर्षापासून भारतातील अनेक लोकप्रिय व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला. आता बिग बॉस मध्ये सदस्य राहिलेल्या सोनाली फोगाट हिच्या निधनाची वार्ता समोर आली आहे. सोनालीच्या निधनाची वार्ता ऐकून प्रेक्षकवर्ग व कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Sonali fogat News

काल दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी रात्री गोवा येथे सोनाली फोगाटचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली बीजेपीच्या काही नेत्यांसोबत गोव्यात होती. रात्री सोनालीने तिच्या स्टाफला मला बरे वाटत नाही असे सांगितले होते. त्यानंतर सोनालीला दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच सोनालीची प्राणज्योत मावळली होती.

Sonali fogat News

बिग बॉस मध्ये येण्याच्या अगोदर सोनाली ही भारतीय जनता पार्टीची नेता राहिली आहे. 2019 मध्ये हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत सोनालीने आमदारकीची निवडणूक लढली होती. परंतु, आदमपूर मतदार संघातून सोनालीचा काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई यांच्याकडून पराभव झाला होता.

Sonali fogat News

त्यानंतर कुलदीप बिश्नोई यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वीच कुलदीप यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सोनाली फोगाट यांची त्या पदावर वर्णी लागल्याची शक्यता होती. याच कारणाने सोनालीच्या निधनावर काहीजण संशय व्यक्त करीत आहेत. बिग बॉस 14 मधील त्यांचा प्रवास उत्तम होता व त्यांचा स्वभाव सलमान खान याला देखील आवडला होता.

Sonali fogat News

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *