अभिनय क्षेत्रातून गेल्या काही वर्षात आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या ऐकायला मिळाल्या. अशा घटनांमुळे त्यांच्या फॅन्सना मोठा धक्का देखील बसला होता. आता परत एकदा अभिनय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Actress Vaishali death news
हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात लोकप्रिय असणारी अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या निधनाची धक्कादायक वार्ता समोर आली आहे. ससुराल सिमर का – 2, ये रिश्ता क्या कहलाता है या गाजलेल्या मालिकां वैशाली ठक्कर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आज तिने तिच्या इंदोर येथील राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

वैशाली ही गेल्या 1 वर्षापासून इंदोर येथे राहत होती. आत्महत्येची माहिती मिळताच इंदोर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठी द्वारे अभिनेत्रीच्या आत्महत्येचे स्पष्ट होवू शकते. तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटला पाहता तिच्या पोस्ट वरून तरी ती कोणत्या त्रासात असल्याचे दिसून येत नाही.

वैशालीच्या अभिनय क्षेत्राची “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतून केली होती. या मालिकेत तिने संजना हे लोकप्रिय पात्र साकारले होते. त्यानंतर तिने ये है आशिकी, ससुराल सिमर का – 2 या मालिकेत दिसून आली होती. वैशालीच्या आत्महत्येची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

Actress Vaishali death news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *