सोशल मीडियावर हिंदी प्रसारमाध्यमांनी बॉलिवुड अभिनेता हृतिक रोशन एका मराठी अभिनेत्रीच्या साखरपुड्याला उपस्थित राहिल्याचा बातम्या प्रसारित केल्या. हृतिक त्याची गर्लफ्रेंड साबा सोबत या साखरपुड्याला उपस्थित होता. ज्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा झाला त्या अभिनेत्रीचे नाव भाग्यश्री मोटे असून 9 ऑक्टोबरला तिचा साखरपुडा झाला आहे.

Bhagyashree mote news
देवयानी फेम अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून फॅन्सना सुखद धक्का दिला. भाग्यश्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही महिन्यांपू्र्वीच उघड केले होते. तिनं तिच्या प्रियकरासोबतच्या फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करून दोघांच्या नात्याचा खुलासा केला होता. भाग्यश्रीच्या जोडीदाराचे नाव विजय पलांडे असून दोघे अखेर बंधनात अडकले आहेत.

Bhagyashree mote news

विजय हा बॉलिवुड अभिनेता हृतिक रोशन याचा मेकअप आर्टिस्ट आहे. त्यामुळे हृतिकने त्याच्या मेकअप आर्टिस्टच्या साखरपुड्याला उपस्थिती लावून मनाचा मोठेपणा दाखविला. कार्यक्रमाला हृतिक त्याची गर्लफ्रेंड सबा आजाद ही देखील दिसून आली. या कार्यक्रमाचे फोटोज् भाग्यश्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले.

Bhagyashree mote news
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *