मुंबईत मोठ्या थाटामाटात “लोकमत” वृत्तपत्रा तर्फे पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेता रणवीर सिंग, अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री कियारा आडवाणी यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा संपूर्ण कार्यभार नाना पाटेकर यांनी सांभाळला.

Kiyara latest news
या कार्यक्रमावेळी लोकमत वृत्तसंस्थेचे चेअरमन विजय दर्डा यांनी अभिनेत्री कियारा आडवाणी हिला एक भन्नाट प्रश्न विचारला. शिंदे-फडणवीस यांच्या समोरच विजय यांनी कियाराला “तुला फडणवीस की शिंदे यांच्या पैकी कोणत्या पक्षात जायला तुला आवडेल” असे विचारले. त्यावर तिने अत्यंत सावध पवित्रा घेऊन स्मार्ट उत्तर दिले.

Kiyara latest news

कियारा म्हणाली, “क्षमा करा, मी अभिनेत्री म्हणूनच ठीक आहे. मी हे एक्स्पर्ट कडे पाठविते.” यावेळी रणवीर सिंग देखील कियाराला कार्यक्रम संपला चल घरी असे ओरडुन सांगताना दिसून आला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *