कर्नाटकात हिजाबवरून सुनावणी सुरू असताना तेलंगाणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगाणात राज्य सेवा परीक्षेसाठी आलेला महिला परीक्षार्थींना मंगळसुत्र काढण्यास सांगितले आहे. रविवारी अदिलाबात जिल्ह्यात तेलंगाणा राज्य सेवा आयोगाची एक परीक्षा होती. तेव्हा हिंदू महिलांना त्यांच्या बांगड्या, अंगठी, कानतले, सोनसाखळी आणि पैंजण काढण्यास सांगितले. काही महिलांना मंगळसुत्रही काढण्यास सांगितले. तर दुसरीकडे बुरखा घातलेल्या महिलांना थेट प्रवेश देण्यात आला होता.

Secularism in telangana

त्यांनी बुरखा घातला होता म्हणून त्यांना मज्जाव करण्यात आला नाही. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.ट्विटरवर भाजप नेत्या प्रिती गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

त्यानुसार काही हिंदू महिलांना परीक्षा केंद्रा बाहेर अडवून त्यांना बांगड्या, पैंजण, कानातले ही आभुषणे काढण्यास सांगितले जात आहे. इतकेच नाही तर काही महिलांना मंगळसूत्रही काढण्यास सांगितले होते. तर दुसरीकडे काही मुस्लिम महिला परीक्षेला बुरखा घालून आल्या होत्या.

परंतु पोलिसांनी यांना कुठेही अडवले नव्हते. अदिलाबादच्या विद्यार्थी महाविद्यालयात ही घटना घडली. भाजप नेत्या प्रिती गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर करत तेलंगाणा राज्याची ही धर्मनिरपेक्षता असून ही लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे.

प्रिती गांधीसह अनेक भाजप नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करून सत्ताधारी पक्ष तेलंगाणा राष्ट्र समितीवर टीका केली आहे. तर दुसरीकडे तेलंगाणा राष्ट्र समितीचे नेते कृष्णन यांनी ही बाब फेटाळली आहे. परीक्षेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समान वागणूक दिल्याचे त्यांनी सांगून भाजप राज्यात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कृष्णन यांनी केला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *