बिग बॉस मराठी मधील शिव ठाकरे – वीणा जगताप ही जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात या जोडीची खूपच चर्चा झाली होती व दोघांनी रिलेशनशिप मध्ये असल्याचे देखील सांगितले होते. या दोघांना फॅन्स कडून देखील खूप प्रेम मिळाले होते.


शिव व वीणा हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नसल्याने दोघांमध्ये दुरावा झाला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉस मराठी-2 चा विजेता असणारा अभिनेता शिव ठाकरे हा सध्या हिंदी बिग बॉस मध्ये दिसून येत आहे. तो बिग बॉस मध्ये परतल्याने त्याच्या व विणाच्या नात्याबद्दल परत चर्चेला उधाण आले आहे.

Shiv Veena thakare news

सोशल मीडिया वर या दोघांचे फॅन्स हे दोघे कायम एकत्र हीच इच्छा व्यक्त करताना दिसून येतात. त्यातच वीणाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर प्रश्न उत्तर सुरू केले असता तिला एका फॅनने साकारली “शिव आणि तुझं काय चाललंय” असा प्रश्न विचारला होता. त्यावर वीणाने रागात उत्तर दिले. ती म्हणाली, “पहिल्यांदा आणि शवटचं सांगते. मी माझ्या खाजगी आयुष्याबद्दल कोणालाही उत्तर देणार नाही. काही नैतिकता ठेवा आणि श्वास घेण्यासाठी थोडी जागा द्या. मी कधी तुम्हाला तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल विचारलं आहे का? नेहमी स्वतःचे बघत राहा.” वीणाच्या या उत्तराने दोघात नक्कीच काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Shiv Veena thakare news
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *