आरोग्य विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेताच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचा धडाका सुरू असल्याचे दिसून आले आहे. तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्‍य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंडे यांना तो देण्यात आला आहे. राज्‍यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटीबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

आरोग्‍य संस्‍था २४ तास कार्यरत राहतील, आरोग्‍य सेवांपासुन राज्‍यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले होते

काल रात्री दीडच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात केली.

रुग्णालयांची पाहणी केल्यावर डॉक्टर उपस्थित नसल्यास निलंबनाची कारवाई होणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. पुण्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात केली तपासणी ,तेथे डॉक्टर उपस्थित असल्याने कारवाई टळली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *