गेल्या काही मिनिटांपासून सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय असणारा प्लॅटफॉर्म म्हणजेच व्हाट्सअप हे ॲप काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दैनंदिन कामातील अत्यंत अविभाज्य घटक बनलेल्या व्हाट्सअप चे अचानक बंद पडल्याने अनेकजण चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार हे का घडले असावे याचे कारण समोर आले आहे.

कोणत्याही ॲपसाठी भारत देश हा अत्यंत मोठा ग्राहक क्षेत्र मानला जातो. त्यामुळे बऱ्याच ॲपचे भवितव्य भारतावर अवलंबून असते. भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी करण्यात येत आहे. अशातच दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण व्हॉट्सॲप द्वारे होताना दिसून येत असते. त्यामुळे या मेसेजेसचा प्रभाव व्हॉट्सॲप वर पडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या व्हॉट्सॲप वर कोणीही कोणाला मेसेज सेंड करू शकत नाही. हे का झाले, याबाबत व्हॉट्सॲप कडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु, व्हॉट्सॲप हँग होणे ही कोणती नवीन गोष्ट नाहीये. यापूर्वी देखील बरेचदा व्हॉट्सॲप हँग झाले आहे. त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहील, हे मात्र नक्की.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *