नोव्हेंबर महिन्याची सुरुवात बॉलीवूड रसिकांसाठी दुःखद अशी झाली आहे. 90 च्या दशकात बॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री “रंभा” हीचा मोठा अपघात झाला आहे. रंभाचा अपघात हा कॅनडामध्ये झाला असून ती व तिची मुलगी जखमी झाल्याचे समजते.


रंभाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या अपघाताची माहिती दिली असून या अपघातात तिने स्वतःच्या मुलीसाठी प्रार्थना करण्याचे फॅन्सला आव्हान केले आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर दवाखान्यातून मुलीची फोटो शेअर केली असून त्यात डॉक्टर तिच्या मुलीवर उपचार करताना दिसून येत आहेत.

“शाळेतून मुलांना घरी घेऊन जाताना आमची कार एका चौकात दुसऱ्या कारला धडकली. कार मध्ये मुलांसोबत मी व मुलांची काळजी घेणारी नैनी होती. छोट्या जखमा झाल्या असून माझी छोटी मुलगी साशा आता दवाखान्यात आहे. प्लीज आमच्यासाठी प्रार्थना करा” असे रंभाने पोस्ट मध्ये म्हटले आहे. रंभाने जुडवा, बंधन, घरवाली बाहरवाली अशा चित्रपटात काम केले आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *