मंगळवारची सकाळ साऊथ चित्रपट चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमीने सुरू झाली. लोकप्रिय अभिनेते रामकृष्ण मूर्ती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ॲक्टर कृष्णा यांनी साऊथ सिनेमांसाठी मोठे योगदान दिले होते व त्यामुळे त्यांच्या जाण्याने साऊथ इंडस्ट्री मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

South actor death news
ॲक्टर कृष्णा हे साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचे वडील होते. काल दिनांक 14 नोव्हेंबर रोजी कृष्णा यांना हृदय विकाराचा झटका आल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. परंतु, आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास ॲक्टर कृष्णा यांची प्राणज्योत मावळली. वडीलांच्या निधनानंतर अभिनेता महेश बाबू याला मोठा धक्का बसला आहे.

South actor death news
महेश बाबू याने या वर्षभरात आपल्या कुटुंबातील तिसऱ्या जवळच्या सदस्याला गमविले आहे. जानेवारी 2022 मध्ये मोठा भाऊ व स्पटेंबर 2022 मध्ये आईला गमविले होते. त्यामुळे महेश बाबू साठी हे वर्ष अत्यंत कठीण असे गेले. कृष्णा हे नावाजलेले अभिनेते होते व त्यांना 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

South actor death news
अभिनेता अल्लू अर्जुन ने देखील कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “ज्येष्ठ अभिनेते कृष्ण गुरू यांच्या निधनाने हृदय तुटले आहे. तेलगू सिनेमातील त्यांचे योगदान शब्दात वर्णन करता येणार नाही. सर्व प्रकारे खरा सुपरस्टार, RIP” अशा शब्दात अल्लू अर्जुनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *