मराठी अभिनय क्षेत्रातील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सर्वकालीन लोकप्रिय मालिकांपैकी एक मानली जाते. परंतु, आता या मालिकेच्या फॅन्स साठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे – जाधव हिचे आज अपघातात दुःखद निधन झाले आहे.

Tuzyat jiv rangala news
तुझ्यात जीव रंगला मालिकेत राधा हे पात्र साकारणाऱ्या कल्याणी कुरळे हिच्या निधनाची वार्ता ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कल्याणीने अभिनयासोबतच स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला होता. तिने कोल्हापूर सांगली महामार्गावर “प्रेमाची भाकरी” नावाचे हॉटेल सुरू केले होते. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ती तिचे हॉटेल बंद करून घराकडे निघाली असता तिचा हा अपघात झाला.

Tuzyat jiv rangala news
कल्याणी रात्री उशिरा हॉटेल बंद करून स्कुटीवर घराकडे निघाली होती. कोल्हापूर सांगली हायवे वर तिला डंपर ने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 7 दिवसांपूर्वीच कल्याणीने तिचा वाढदिवस साजरा केला होता व त्या वाढदिवशी तिने स्वतः भाकरी बनवून हॉटेल मधील ग्राहकांना खावयास दिल्या होत्या.

कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिके सोबतच अन्य काही मालिकांमधून देखील अभिनयाचा ठसा उमठवला होता. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ आणि सन मराठीवरील ‘सुंदरी’ अशा मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.

https://mardmarathi.com/2022/11/tuzyat-jiv-rangala-news/

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *