कलासृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना सेटवर छोट्या मोठ्या जखमा होत असतात. काही अपघात अनावधानाने तर काही ॲक्शन सीन करताना घडत असतात. मराठी अभिनेत्री सोबत देखील असेच काहीतरी घडले असून यामुळे त्या अभिनेत्रीच्या डोळ्याला जखम झाली आहे.
अभिनेत्री गायत्री सोहम या अभिनेत्री बाबतीत ही घटना घडली असून अभिनेत्री स्वतः व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती फॅन्सना दिली आहे. गायत्री सध्या स्टार प्लस वाहिनी वरील पंड्या स्टोअर या हिंदी मालिकेत झळकलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत एका टमाटरचा सिन चालू होता. या सिन दरम्यान गायत्रीच्या डोळ्याला जखम झाली.
मालिकेच्या काही सह कलाकारांनी शूट चालू असताना अचानक टमाटर फेकून एकमेकांना मारायची धमाल करू लागले. त्यातच एकाने एक टमाटर गायात्रीच्या दिशेने फेकून मारला व तो तिच्या डोळ्याला जाऊन लागला. तिच्या डोळ्याभोवती छोटीशी जखम झालेली दिसून येत आहे.