सोशल मीडियावर अनेक मराठी अभिनेत्री आपल्या फोटोज् आणि रील्स व्हिडिओज मुळे व्हायरल होताना दिसून येतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीचे फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्या अभिनेत्रीचे मयुरी शुभानंद असून तिच्या काही फोटोज् आणि व्हिडिओज युवा पिढी साठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
मयुरी मूळची कोकणातील असून तिचा जन्म देखील कोकणात झाला आहे. तिला मराठी सोबतच मालवणी, कोकणी, हिंदी इंग्लिश या भाषा देखील बोलता येतात. मयुरीचे वय 28 असून ती बीएमएस मध्ये पदवीधर झाली व फॅशन डिझायनिंग मध्ये पदव्युत्तर झाली आहे. सध्या ती तिच्या अभिनयाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ पडताना दिसून येत आहे.
मयुरीच्या Mayuri Marathi actress याच सौंदर्या मुळे तिला तब्बल 13 ब्यूटी काँटेस्ट मध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. त्यात मोस्ट टॅलेंटेड समर तुलीप मिस इंडिया, मिस महाराष्ट्र, महाराष्ट्र सुंदरी, मिस कोकण या स्पर्धांचा समावेश आहे. तसेच, तिला एशियन टॅलेंट गोल्डन आयकॉन, इंटरनॅशनल ग्लॅम आयकॉन, गोवा रत्न इंटरनॅशनल अवॉर्ड अशा अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, ती आता फॅशन शोज मध्ये चीफ गेस्ट आणि प्रशिक्षकाची भूमिका साकारत असते.
मयुरी ही ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर व विजय पाटकर यांच्या सोबत “धडपड” मराठी चित्रपटात दिसून आली होती. तसेच, अभिनेता संग्राम साळवी सोबतचे टक्का मक्का हे अल्बम देखील गाजले होते. येत्या काही दिवसात मयुरी परत एकदा मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. सध्या मात्र सोशल मीडियावर निखळ सौंदर्याची आणि बोल्ड अदांची चर्चा होत आहे.