समाजात तृतीयपंथी लोकांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. परंतु, तरीही तृतीयपंथी समाज हा नेहमीच सामान्य समाजातून वेगळा वावरत आहे. परंतु, काही ठिकाणी शुभ कार्यात तृतीय पंथी लोकांना आवर्जून बोलवण्यात येत असते. कारण, त्यांचा आशीर्वाद शुभ मानला जातो.
शुभ कार्यात येऊन ते आशीर्वाद देतात व पैशाची मागणी करतात. लोक देखील स्व खुशीने पैसे देतात. तृतीय पंथी देखील पैसे घेऊन अनेक आशीर्वाद देतात व त्यांनी दिलेल्या आशीर्वादचा परिणाम पण लगेच होवू लागतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओ मध्ये एक तृतीय पंथी एका बाळाला खेळवत असताना दिसत आहे.
सदरील व्हिडिओ मुंबईच्या लोकल मधील असून एका महीलने तिच्या बाळाला किन्नर जवळ दिले. त्या किन्नरने त्या बाळाला अगोदर आशीर्वाद दिले व नंतर अंगाशी घेऊन बराच वेळ खेळू लागला. बाळ देखील त्या किन्नरच्या कुशीत खळखळून हसू लागले. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.