दिग्दर्शक ओम राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी घोषित केले होते की, ते मॉडर्न सिनेमॅटिक स्टाईलचा रामायणाचे नवे रूप प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहेत. तेंव्हा पासूनच प्रेक्षक वर्ग या चित्रपटाला घेऊन उत्साहित होता. प्रभास मुख्य अभिनेता असलेला “आदिपुरूष” शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु, या चित्रपटा बाबत प्रेक्षकांकडून सपशेल नाराजी झालेली पाहायला मिळत आहे.
“आदिपुरुष” या चित्रपटातील डायलॉग ऐकून प्रेक्षक संतापलेले दिसून येत आहेत. या चित्रपटातील पुढील काही डायलॉग आहेत ज्यावर प्रेक्षक आक्षेप घेत आहेत.
“तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने चला आया।” (रावणाचा मुलगा इंद्रजीतने हनुमानजींना म्हणलेला डायलॉग)
“कपड़ा तेरे बाप का!! तेल तेरे बाप का! जलेगी भी तेरे बाप की।” (हनुमानजींनी इंद्रजीतला म्हणाले)
“जो हमारी बहनों को हाथ लगाएगा उनकी लंका लगा देंगे।” (हनुमानजी रावणाच्या सभेत म्हणाले)
“मेरे एक सपोलेने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है।” (लक्ष्मण ने वरी केलेल्या वारा नंतर इंद्रजीत म्हणाला)
हे डायलॉग सध्या वादग्रस्त ठरत असून यावर चित्रपटाचा लेखक मनोज मुंतशिर हे म्हणाले, “या चित्रपटाचे डायलॉग जाणून बुजून लिहिण्यात आले आहेत. मोठे मोठे लोक गोष्ट सांगताना असेच डायलॉग घेऊन गोष्टी सांगत असतात. फक्त हनुमानजींच्या डायलॉग वरच चर्चा होत आहे. लोकांनी प्रभू श्री रामांच्या सवांदावर पण चर्चा करायला हवी.”