विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्याकांडला काही दिवस उलटले नाही तोवरच आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत एका मुलाने एका मुलीवर कोयत्याने हल्ला केली असल्याची घटना घडली आहे.
सदाशिव पेठेत भरदिवसा थरार: एकतर्फी प्रेमातून बाईकवरील तरुणीवर कोयत्याचे सपासप वार, पाहा VIDEO #Pune #crime #attack #sadashivpeth pic.twitter.com/psrymBxUHs
— Anish Bendre (@BendreAnish) June 27, 2023
दिवसाढवळ्या पुण्यातील सदाशिव पेठ येथे एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्याच मित्राने कोयत्याने हल्ला केला. या प्रकारामुळे पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. ज्या वेळी तो मुलगा हल्ला करीत होता त्यावेळी तिथून जात असलेल्या 2 तरुणांनी प्रसंगावधान दाखवीत त्या मुलीचा जीव वाचविला.
सदरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तरुणीचा जीव वाचविणाऱ्या मुलांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. तरुणीच्या डोक्याला जखम झाली असून तरी ती सुखरूप असल्याचे समजते. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाला असल्याचे सदरील तरुणीने सांगितले.
पुण्यात त्या तरुणाने मुलीवर कोयत्याने हल्ला का केला?#pune #attackongirl #PuneCrime pic.twitter.com/2A1uGiwPzw
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) June 27, 2023
गुन्ह्यातील आरोपी त्या तरुणीचा नेहमीच पाठलाग करीत होता. ती त्याला नकार देत होती तरी पण तो तिचा पाठलाग करणे बंद करीत नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने हा गुन्हा केला. तो आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.