काल पुण्यात दर्शना पवार हत्याकांडची पुनरावृत्ती होता होता वाचली. शहरातील सदाशिव पेठेत एका तरुणाने त्याच्याच मैत्रिणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी एमपीएससीची तयारी करणारे लेशपाल जवळगे व अन्य युवकांनी त्या तरुणीचा जीव वाचविला.
स्वतःचा जीव धोक्यात घालून तरुणीला वाचविनाऱ्या लेशपालने आज एक ठेवलेली स्टोरी वाचून अनेकांना दुःख झाले आहे. काल पासून त्याला सोशल मीडियावर मेसेज मध्ये त्याची आणि त्या मुलीची जात विचारण्यात येत आहे. ही गोष्ट त्याला खूपच संताप आणणारी असल्याचे त्याच्या स्टोरी मधून दिसून येत आहे.
लेशपाल म्हणाला, “त्या मुलीची आणि मुलाची “जात” कुठली होती असं मला मेसेज करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धिजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होवू शकता ना ही समाजाचे, कीड लागली आहे तुमच्या वरच्या थोड्याफार असलेल्या भागाला.” लेशपाल ची ही स्टोरी वाचून अनेकजण लेशपालच्या बाजूने पोस्ट करीत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.