काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक “आयेशा” नामक पाकिस्तानी मुलगी खूप व्हायरल झाली होती. त्या मुलीने एका कार्यक्रमात “मेरा दिल ये पूकारे आजा” या गाण्यावर डान्स केला होता आणि तो डान्स पाहून ती युवा पिढीचे आकर्षण ठरली होती. याच व्हिडिओने ती सोशल मीडियावर रातोरात स्टार झाली होती. मात्र आता तिच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एका न्यूज मीडियाने आयेशाचा ड्र’ग्स च्या अती सेवनाने निधन झाल्याची वार्ता प्रसिद्ध केली. ही बातमी वाचून अनेकांना मोठा धक्का बसला. परंतु, ही घटना पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले आहे. स्वतः आयेशाने याबद्दल पोस्ट करून ती जिवंत असल्याचे सांगितले आहे. तसेच, ती बातमी फेक असल्याचे सांगत तिने या बातमीमुळे ती खूप दुखावली असल्याचे समजते.
आयेशा म्हणाली, “या अफवांनी काय होईल व त्याच्या परिणामांचा विचार न करता चुकीची बातमी पसरविणे बेजाबदार कृत्य आहे. याला लवकरात लवकर बंद केले पाहिजे. तुम्हा लोकांना जराही कल्पना नाही की या या गोष्टींमुळे कोणाच्या जीवनावर किती परिणाम होवू शकतो. मी लोकांना आकर्षित करण्यासाठी काही खास कधीच केले नाही, तरी तुम्ही माझ्या जीवनाला खराब करायला का बघत आहात?” अशा प्रश्न तिने विचारला.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.