महाराष्ट्रात नव्याने सुरू झालेल्या समृध्दी महामार्गावर अपघाताचे सत्र थांबायचे नाव घेत नाही आहे. याच महामार्गावर काल रात्री 1.30 वाजेच्या सुमारास एका प्रायव्हेट ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला व त्यात तब्बल 29 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची वार्ता समोर आली आहे. अपघातानंतर त्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला व त्यामुळेच 29 प्रवाशांचे होरपळून निधन झाले.

Buldhana accident

हा अपघात इतका भयंकर होता की प्रत्यक्षदर्शींना ते पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले होते. अपघाताची घटना जेंव्हा पोलिसांना समजली तेंव्हा पोलिसांनी सिंदखेड राजा येथील अडव्होकेट गणेश म्हेत्रे यांना कॉल केला. गणेश म्हेत्रे व त्यांचे साथीदार नेहमीच अपघातग्रस्तांच्या मदतीला धावतात. त्यामुळे ते 10-15 मिनिटात अपघातस्थळी पोहचले.

 

ज्यावेळी गणेश म्हेत्रे त्या ठिकाणी पोहचले तेंव्हा काही लोक बाहेर येताना दिसले तर काही लोक बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असतानाच डिझेल टाकीचा स्फोट झाला व आतील लोकांनी होरपळून जीव सोडून दिला. सकाळी जेंव्हा आतील सर्व बॉडी बाहेर काढत होते तेंव्हा एका बाळाने तिच्या कवटाळून धरले होते. ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

Buldhana accident

 

या घटने नंतर समृध्दी महामार्गाबद्दल अनेकजण प्रश्नचिन्ह उभारताना दिसून येत आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार कडून प्रत्येकी 5-5 लाख रुपये तर केंद्र सरकार कडून 2-2 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घटने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *