गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात एका अपघाताने सर्वांना हादरवून सोडले होते. महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गावर एका खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला व नंतर डिझेल टाकीचा स्फोट होवून 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमविले. त्यातच एका 18 वर्षाच्या मुलीचा देखील समावेश होता.
हा अपघात इतका भयंकर होता की प्रत्यक्षदर्शींना ते पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले होते. या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये तनिषा तायडे नामक मुलगी देखील बसली होती. तनिषा ही वर्ध्याहून पुण्याला जाण्यासाठी त्या ट्रॅव्हल्स मध्ये बसली होती. त्यावेळी तिने तिच्या बहिणीसोबत 12.30 वाजेपर्यंत व्हॉट्सऍपवर चॅटिंगही केलं. त्या चॅटिंग मध्ये तनिषा तिच्या बहिणीला गाडी खूप हलत आहे, मला भीती वाटत आहे, असं सांगत होती.
तनिषाच्या बहिणीने तिला झोपण्यास सांगितले. तनिषाला उद्या कॉलेज मध्ये काम असेल असे सांगत आत्ता झोपून घे असे सांगितले. परंतु, ही झोप शेवटची ठरेल याची तनिषाच्य बहिणीला देखील कल्पना नव्हती. त्याहूनही दुःखाची गोष्ट म्हणजे तनिषाच्या वडिलाचे निधन झाले होते. पुढील शिक्षणासाठी तनिषाच्या बहिणीने तिला पुण्याला पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तनिषाची बहिणी पुण्यात आयटी विभागात जॉब करते.
या घटनेनंतर समृध्दी महामार्गाबद्दल अनेकजण प्रश्नचिन्ह उभारताना दिसून येत आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार कडून प्रत्येकी 5-5 लाख रुपये तर केंद्र सरकार कडून 2-2 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घटने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.