बॉलिवूड मध्ये गेल्या काही काळापासून “मी टू” प्रकरणाची चर्चा सुरू आहे. नवीन अभिनेत्रींना काम मिळविण्यासाठी दिग्दर्शक सांगतील ते करावे लागते असा आरोप काही अभिनेत्रींनी केला होता. त्यामुळे बॉलिवूड ची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली व त्याचा फटका अनेक चित्रपटांना मिळाला.
आता आणखीन बॉलिवुडच्या एका अभिनेत्रीने एक धक्कादायक व्यक्तव्य केले आहे. अभिनेत्री पायल घोष हीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून भयानक वास्तव्य समोर आणले आहे. तिने तिच्या पोस्ट मध्ये असे म्हटले, “मी 11 व्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करीत आहे. जर मी झोपले असते तर आज 30 चित्रपट पूर्ण केले असते.”
पायलच्या या व्यक्तव्याने परत एकदा बॉलिवूड चर्चेत आले आहे. यापूर्वीही पायलने काही दिग्गज दिग्दर्शक व निर्मात्यांवर याबद्दल आरोप केले होते. तसेच तिने कॅपशन मध्ये असे म्हटले की, “तुम्हाला मोठे चित्रपट मिळवायचे असतील तर झोपावेच लागेल, झोपल्याशिवाय ते शक्यच नाही.”
येत्या काही दिवसात पायलचा अभिनेता कृष्णा सोबत “फायर ऑफ लव्ह – रेड” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पायल ने केलेल्या या वादग्रस्त व्यक्तव्याने आता परत एकदा बॉलिवूड मध्ये खळबळ माजण्याची शक्यता आहे. याचे काय पडसाद उमटतील हे येणारा काळच सांगेल.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.