बॉलिवूडच्या बऱ्याच मॉडर्न अभिनेत्री सध्या फिटनेस बाबतीत खूप काळजी घेताना दिसतात. त्यात अनन्या पांडे, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, दिशा पटानी या अभिनेत्रींचा समावेश आहे. परंतु, त्यातच काही 90 मधील फेमस अभिनेत्रींनी आपल्या फिटनेसने अनेकांना प्रभावित केले आहे.
चाळीशी पार करून देखील बॉलिवूडच्या 2 अभिनेत्री फिटनेस बाबतीत अनेक तरुणींना मागे टाकत आहेत. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेत्री मलायका अरोरा यांचा समावेश आहे. शिल्पा शेट्टी तिच्या लवचिक अंगासाठी प्रसिद्ध असून ती सर्व प्रकारचे योगासने करू शकते. तसेच, मलायका देखील एकही दिवस न चुकता योगा क्लासेसला जाताना दिसून येते. सध्या तिच्या योगा क्लास बाहेरील काही फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत.
मलायका नेहमी प्रमाणे तिच्या योगा क्लास मधून बाहेर पडली व मीडिया तिचे फोटोज् आणि व्हिडिओज घेण्यासाठी तिची वाट पाहत होते. तीने घातलेल्या आऊटफिट मधून ती खूपच बोल्ड दिसत होती. मीडिया आणि फॅन्सच्याही गोष्ट लक्षात आली व तिचे हे फोटोज् सध्या व्हायरल होताना दिसून येत आहेत.
मलायकाचे फिटनेस प्रती प्रेम पाहून अनेक युवा अभिनेत्री साठी ती एक आयडॉल आहे. मलायका 2 लेकराची आई असून देखील तिने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. अरबाज खान सोबत झालेल्या डिव्होर्स नंतर ती आता अभिनेता अर्जुन कपूर सोबतच्या अफेयर मुळे जास्त चर्चेत असते. दोघे एकमेकांना डेट करतात हे सर्वांनाच माहिती आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.